Chandrapur Discoverysakal
विदर्भ
Chandrapur Discovery : चंद्रपुरात दुर्मीळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्मे आढळली; भूशास्त्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे यांचा दावा
Stegodon Fossils : चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा-पैनगंगा नदीपात्रात भूशास्त्रज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी दुर्मीळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्म शोधले आहेत. हे जीवाश्म सुमारे २५,००० वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे जीवाश्म प्रथमच आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
चंद्रपूर : वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५,००० ते १२००० वर्षा दरम्यान विदर्भात विचलन करणारे आणि आज लुप्त झालेल्या दुर्मीळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्मे येथील भूशास्त्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे यांनी नुकतीच शोधली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची प्लेईस्टोसीन काळातील मिळालेली हत्तीची ही दुर्मीळ जीवाश्म असल्याचा दावा प्रा. चोपणे यांनी केला आहे.

