
पवनार (वर्धा) : येथील धाम नदीपात्रात रविवारी (ता. २२) दुपारी साडेतीनच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यश चव्हाण, रा. रामनगर, वर्धा असे मृत तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत आलेल्या यशने खोल पाण्याचा अंदाज न घेताच पाण्यात उडी घेतली आणि काही क्षणांतच गडप झाला.