
अमरावती : दुर्गम भागातील मुलामुलींना शहराच्या ठिकाणी सुविधा देण्याकरिता आदिवासी विकास विभागाकडून वसतिगृह संकल्पना राबविण्यात येते. परंतु, अजूनही पाचशे वा एक हजार विद्यार्थी क्षमता असलेली या विभागातील २७५ वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.