Medical Colleges : मेडिकल कौन्सिलने ३० महाविद्यालयांना फटकारले; सोयीसुविधांमध्ये आढळल्या त्रुटी, सर्वांना कारणे दाखवा नोटीस
National Medical Council : राज्यातील ३० वैद्यकीय महाविद्यालयांवर मेडिकल कौन्सिलने फटकारा लावला आहे कारण त्यांना वार्षिक नूतनीकरणासाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले. यामध्ये नव्याने सुरू झालेल्या नऊ महाविद्यालयांचा समावेश आहे.
बुलडाणा : वैद्यकीय महाविद्यालयांच्या वार्षिक नूतनीकरणासाठीच्या तपासणीमध्ये मेडिकल कौन्सिलने (राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग) विविध सोयी सुविधांबाबत राज्यातील ३० महाविद्यालयांना फटकार लगावली आहे.