सर्व गटातील रुग्णांना घेता येणार 'महात्मा फुले' योजनेचा लाभ, अडचणीसाठी 'या' क्रमांकावर करा फोन

corona
coronae sakal
Updated on

यवतमाळ : कोरोना (coronavirus) झालेल्या रुग्णांचा रुग्णालयांचा खर्च अनेकांच्या आवाक्‍याबाहेरचा आहे. सर्वसामान्यसह अनेकांना तो न परवडणारा आहे. अशास्थितीत सर्व रुग्णांवर उपचार व्हावे, यासाठी कोरोना आजाराचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत (mahatma phule janarugya yojana) समावेश करण्यात आला. या योजनेतून आतापर्यंत जिल्हातील तीनशे रुग्णांवर उपचार करण्यात आले. रुग्णांना या योजनेचा मोठा आधार मिळाला आहे. (300 corona positive patients took benefits from mahatma phule janarogya yojana in yavatmal)

जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. ऍक्‍टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सात हजार 306 वर पोहोचली आहे. मृत्यूचा आकडा 1494 वर गेला आहे. राज्यभरात संसर्गाचे प्रमाण वाढलेलेच आहे. अनेक रुग्ण गंभीर तर काही अतिगंभीर स्थितीत जात आहे. जिल्हा रुग्णालय असो की कोवीड केअर सेंटर रुग्णांनी भरले आहे. खासगीची स्थिती तशीच आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णांना कोणताही खर्च येत नाही. खासगीत रुग्णांच्या नातेवाईकांसमोर मोठे संकट उभे राहते. अशास्थितीत खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांला आधार मिळावा म्हणून राज्य शासनाने कोवीड-19 आजाराचा समावेश महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला. यापुर्वी अनेक गंभीर आजाराचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. जिल्ह्यात "महात्मा जोतीराव फुले' योजनेशी संलग्नीत 26 रुग्णालय आहे. यात 17 खासगी तर नऊ शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे. यातील पाच खासगी रुग्णालयात कोवीड-19 रुग्णांना लाभ देण्यात आला. कोवीडसाठी 15 ते 85 हजार रुपयापर्यंत मदत शासनाकडून केली जाते. यवतमाळ शहरात सर्वाधिक 110 रुग्णांना कोवीडची मदत दिली आहे. यवतमाळसह पुसद, दिग्रस या ठिकाणी खासगी रुग्णालयांनी मदत दिली. रोज दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मदत मिळणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त रुग्णांचा या योजनेत समावेश करणाच्या सूचना दिल्या आहेत.

रुग्णालय दिलेली मदत

  • साईश्रद्धा,यवतमाळ-110

  • लाईफलाइन पुसद-19

  • आरोग्यधाम दिग्रस-60

  • आयकॉन पुसद-100

  • मेडीकेअर पुसद-14

महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेत आतापर्यंत 303 रुग्णांना मदत देण्यात आली आहे. एकुण बेड संख्येच्या 25 टक्के बेड योजनेसाठी आरक्षीत ठेवले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देण्याचे निर्देश दिले आहे. काही अडचण असल्यास रुग्णांच्या नातेवाईकांनी 7218992244 या क्रमांकावर संपर्क साधावा.
-सुरेद्र इरपनवार, जिल्हा समन्वयक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com