
पुसद (जि. यवतमाळ) : निंबी-पार्डी शिवारातील बाबाराव अंभोरे पाटील यांच्या शेतातील दोन एकरात लागवड केलेल्या पपईंच्या बागेतील तीनशे झाडांची अज्ञात व्यक्तींनी कत्तल केली. ही घटना रविवारी (ता.सहा) सकाळी उघडकीस आली. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वसंतनगर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.