

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ३६ कोटी ७९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक दि. २६ मार्चला मंजूर करण्यात आला. हा अर्थसंकल्प प्रगत तंत्रज्ञान, सक्षम समाज आणि शाश्वत ग्रामविकास या मुख्य संकल्पनेवर आधारित असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी सांगितले.