Viral Wedding Card : लग्नाची ३६ पानी लग्नपत्रिका व्हायरल; इतकं लिहीलंय तरी काय, जाणून घ्या

36 pages wedding invitation card from buldhana goes viral on social media
36 pages wedding invitation card from buldhana goes viral on social media

बुलढाणा : उन्हाळा सुरू होताच लगबग सुरू होते ती लग्न सोहळ्यांची, या लग्न समारंभात लोक लाखो रुपये खर्च करून हौस भागवतात. अशा लग्न सोहळ्यात काहीतरी हटके केल्याचे अनेक प्रकार सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

नुकतीच अशी हटके लग्नपत्रिका व्हायरल होते आहे. या लग्नपत्रिकेने एका वेगळ्याच कारणामुळे सर्वांचे लक्ष वेधले असून ही पत्रिका एक दोन नव्हे तर तब्बल ३६ पानांची आहे.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार बुलढाणा येथील निवृत्त झालेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याची ही ३६ पानांची लग्नाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

एशिता शिखरे आणि मयूर डोंगरे हे दोघेही उच्च शिक्षित असून उच्च पदावर कार्यरत आहेत यांचा शुभ विवाह 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे. या पत्रिकेत एशिता आणि मयूरचा फोटो अल्प परिचय देण्यात आला आहे. याच बरोबर शिखरे परिवाराचा फोटो व माहिती देखील देण्यात आली आहे.

हेही वाचा - What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

36 pages wedding invitation card from buldhana goes viral on social media
Aaradhya Bachchan : यूट्यूब टॅब्लॉइडविरोधात आराध्या बच्चन पोहोचली दिल्ली हायकोर्टात, जाणून घ्या काय आहे प्रकरण

त्याचबरोबर या पत्रिकेमध्ये आवली व संत तुकाराम, शिव-पार्वती विवाह सावित्रीबाई व महात्मा ज्योतिराव फुले यांची माहिती तसेच जिज्ञासक महदंबा, संत जनाबाई संत मुक्ताबाई, अक्का महादेवी यांची माहिती देण्यात आली आहे.

पुण्यातील जिजाऊ प्रकाशन यांनी ही पत्रिका तयार केली आहे.दरम्यान या पत्रिकेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

36 pages wedding invitation card from buldhana goes viral on social media
Pune Rain News : पुण्यात आजही पाऊस, सिंहगड रस्त्यावर गारांसह मुसळधार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com