esakal | Big Breaking : वाढदिवस साजरा करायला गेले, पण वाटतेच काळाने घातला घाला, कारच्या भीषण अपघातात ४ ठार, एक जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

4 died in car and tractor accident at mool chandrapur highway

चंद्रपूर-मूल मार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित होत असल्याने मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. सध्या हा मार्ग विस्कळीत असून यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

Big Breaking : वाढदिवस साजरा करायला गेले, पण वाटतेच काळाने घातला घाला, कारच्या भीषण अपघातात ४ ठार, एक जखमी

sakal_logo
By
प्रमोद काकडे

चंद्रपूर : मूल-चंद्रपूर महामार्गावर एका भरधाव कारने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये 2 मुलं आणि 2 मुलींचा समावेश असून हे सर्व मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी घरातील आहेत. 

हेही वाचा - सालेकसातील शेतात आढळला मांजरीसारखा दिसणारा प्राणी; जवळ जाऊन बघितले असता अंगाचा उडाला...

दर्शना उधवाणी (25), प्रगती निमगडे (24), मोहम्मद अमन (23) आणि स्मित पटेल (25) अशी मृतकांची नावं असून योग गोगरी (23) हा अपघातात जखमी झालाय. योग गोगरी याचाच वाढदिवस साजरा करण्यासाठी हे 5 ही जण मंगळवारी रात्री चंद्रपूर मार्गावरील एका हॉटेलमध्ये आले होते. रात्री उशिरा परत जाताना एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला. यावेळेस ट्रॅक्टर-कारमध्ये भीषण धडक होऊन 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर-मूल मार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित होत असल्याने मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. सध्या हा मार्ग विस्कळीत असून यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील उच्चभ्रू घरातील 4 तरुण-तरुणींचा असा अचानक मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.
 

loading image