नागझिरा अभयारण्यात आणणार चार वाघिणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

4 tigresses to be released nagzira wildlife sanctuary nagpur

नागझिरा अभयारण्यात आणणार चार वाघिणी

साकोली (जि. भंडारा) : नागझिरा अभयारण्यात वाघ दिसेनासे झाल्याने पर्यटकांनी या अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या अभयारण्याचे आकर्षण कायम ठेवण्यासाठी वन्यजीव विभागाने ब्रह्मपुरीवरून चार वाघिणी येथे आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, येथील वाघांच्या संख्येत भर पडल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, नागझिरा अभयारण्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये आठ ते नऊ नर वाघ अस्तित्वात आहेत. नागझिरा अभयारण्यात वाघांची संख्या वाढावी याकरिता वाघिणी स्थानांतराची प्रक्रिया सुरू केली आहे. याकरिता वन्यजीव संशोधन संस्था डेहराडून नागझिरा अभयारण्यात वाघ संवर्धनाकरिता तपासणी व संशोधन करीत आहे. या अभयारण्यातील तृणभक्षी प्राण्यांची संख्या, जंगलातील पाण्याची उपलब्धता असे सर्वकष विचार करून वन विभाग प्रशासन शासनाला अहवाल सादर करेल. त्यानंतर मंजुरी प्राप्त होताच नागझिरा अभयारण्यात टप्प्याटप्प्याने वाघिणींचे स्थानांतर करण्यात येणार आहे.

नागझिरा अभयारण्य राष्ट्रीय महामार्गावरील साकोलीवरून उत्तरेकडे २१ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच येथून ६० किलोमीटर अंतरावर गोंदिया येथे रेल्वे स्टेशन, बिरसी येथे विमानतळ आहे. १५ किलोमीटर अंतरावर सौंदड येथे छोटे रेल्वे स्टेशन आहे. येथे दरवर्षी विदेशी पर्यटक येतात. साकोली येथे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प उपसंचालकांचे कार्यालय आहे. नागझिरा अभयारण्याचे क्षेत्रफळ १५१ चौरस किलोमीटर आहे. येथे वाघांची संख्या वाढावी यासाठी एक ते दोन वर्षे वयोगटातील चार वाघिणींचे स्थानांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागझिरा अभयारण्यात वाघांची संख्या कमी झाल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. यासाठी ब्रह्मपुरीवरून चार वाघिणींचे स्थानांतरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

''नागझिरा अभयारण्यात वाघिणींचे स्थानांतर झाल्यानंतर या अभयारण्यातील वाघांच्या संख्येत वाढ होईल. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येतही भर पडू शकेल.''

-पवन जेफ उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, साकोली.

Web Title: 4 Tigersses To Be Released Nagzira Wildlife Sanctuary Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpurvidarbhatiger