
अविनाश साबापुरे
यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची लांबलेली प्रक्रिया आता वेग घेत आहे. त्यात मनाजोगी शाळा मिळविण्यासाठी किंवा असलेली शाळा कायम ठेवण्यासाठी राज्यातील तब्बल ४३ हजार ५६६ शिक्षकांनी दिव्यांग, आजारी असल्याचा दावा केला आहे. बदली पोर्टलवरील या आकडेवारीमुळे राज्यातील शाळांचे ‘आरोग्य’ चर्चेत आले आहे.