esakal | CoronaVirus:विदेशातून आले 46 नागरिक, 36 जणांना होम क्वारंटाईन

बोलून बातमी शोधा

46 citizens from abroad to akola, 36 from home quarantine

राज्यात जरी कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असला तरी अकोल्यात मात्र, अद्यापपर्यंत या आजाराचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, विदेशातून येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, 46 नागरिक आतापर्यंत अकोल्यात दाखल झाले आहे. त्यापैकी 36 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर एका महिला संशयीताचा वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती सर्वोपचार प्रशासनाने दिली आहे.

CoronaVirus:विदेशातून आले 46 नागरिक, 36 जणांना होम क्वारंटाईन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्यात जरी कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असला तरी अकोल्यात मात्र, अद्यापपर्यंत या आजाराचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, विदेशातून येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, 46 नागरिक आतापर्यंत अकोल्यात दाखल झाले आहे. त्यापैकी 36 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर एका महिला संशयीताचा वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती सर्वोपचार प्रशासनाने दिली आहे.


जगभरात कहर घालत असलेल्या कोरोना विषाणूचा रुग्ण अकोल्यात मंगळवारी (ता.17) सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. तथापि, विदेशातून आलेल्या एकूण 46 प्रवाशांपैकी 36 जणांना गृह विलगीकरण (होम क्वारंटाईन) करून ठेवण्यात आले आहे. सध्या आयसोलेशन वॉर्डमध्ये एक रुग्ण असून, यापैकी वैद्यकीय निगराणीचा कालावधी पूर्ण करणारे सहा जण आहेत. तर दोन दिवसापूर्वी दाखल झालेल्या एका संशयीत रुग्णाचा वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती सर्वोपचार रुग्णालयाने दिली आहे.

संशयीत रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह
जिल्ह्यात एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. तथापि,विदेशातून आलेल्या एकूण 46 प्रवाशांपैकी 36 जणांना गृह विलगीकरण (होम क्वारंटाईन) करुन ठेवण्यात आले आहे. तसेच उर्वरित प्रवाशांपैकी चौघे हे अमरावती येथे आहेत. एक प्रवासी नागपूर येथे आहे. ते अद्याप अकोला जिल्ह्यात आलेले नाहीत. तर उर्वरित पाच जणांशी संपर्क सुरू आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली. दरम्यान सोमवारी (ता.16) ज्या व्यक्तीचे नमुने पाठविण्यात आले होते ते निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आज अखेर एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. तथापि सर्व नागरिकांनी कटाक्षाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे.