‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे पाच लाखांवर दान

Buddha-Book
Buddha-Book
Updated on

नागपूर - दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्धांची बौद्धिक भूक भागविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर्स असोसिएशनने ९ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या दानाला आता संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत आहे. बौद्धांच्या संस्कारासाठी उपयुक्‍त असलेला हा ग्रंथ या वर्षी ५ लाख ३५ हजारांवर गेला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील बौद्धांच्या घरोघरी हा ग्रंथ दिसत आहे. या वर्षीसुद्धा हा ग्रंथ सर्वांना मिळणार आहे. 
नऊ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर्स असोसिएशन (बानाई)चे अध्यक्ष पी. एस. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ दान देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाला दीक्षाभूमीवर मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षी ५० हजार ग्रंथांचे दान करण्यात आले.

हे ५० ग्रंथ फक्‍त सहा तासांमध्ये दान करण्यात आले. फक्‍त दहा रुपयांत हा ग्रंथ दान करण्यात आला. तेव्हापासून या ग्रंथांची सतत मागणी वाढत आहे. गेल्या ९ वर्षांमध्ये ५ लाख ३५ हजार अंक प्रकाशित करण्यात आले. त्यांची किंमत ५ कोटी ३५ लाख आहे. हा ग्रंथ घरोघरी मोफत जावा, याकरिता पुढाकार घेणारे बानाईचे अध्यक्ष पी. एस. खोब्रागडे यामागील उद्देश सांगताना म्हणतात की, संपूर्ण देश हा बौद्धमय होता. कालानुरूप बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार योग्य न झाल्याने भारतातून हा धम्म लयास गेला. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिल्यानंतर हा धम्म पूर्ण नव्या रूपाने आणि जोमाने भारतात आला. बौद्धांनी धम्माचे पालन कसे करावे, याविषयी ५ वर्षे मेहनत घेऊन बाबासाहेबांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ लिहिला.

शेकडो बौद्ध ग्रंथांचे वाचन, चिंतन केल्यानंतर हा ग्रंथ पुढे आला. मात्र, बाबासाहेबांनंतर बौद्धांनी फक्‍त बाबासाहेबांना स्वीकारले. धम्माकडे दुर्लक्ष केले. यामुळे हा धम्म घरोघरी असला तरी बौद्ध माणूस हवा तसा संस्कारित झाला नाही. याला कारण म्हणजे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाकडे झालेले दुर्लक्ष. यामुळे समाज संस्कारित करण्यासाठी या ग्रंथाचे दान करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com