गोवरामुळे दरवर्षी दगावतात 50 हजार मुले

File photo
File photo

गोवरामुळे दरवर्षी दगावतात 50 हजार मुले
नागपूर : पोलिओच्या धर्तीवर श्वसनसंस्थेशी निगडित विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य अशा गोवर (छोटी माता) आजाराचे निर्मूलन करण्यात शासनाला अद्याप यश आले नाही. दरवर्षी भारतामध्ये 50 हजार मृत्यू होत असल्याची माहिती पुढे आली आहे. जगात दरवर्षी 1 लाख 34 हजारांवर मृत्यू होतात. दर दिवसाला 367 तर दर तासाला 15 मृत्यू होत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले. जगाच्या तुलनेत 37 टक्के गोवरामुळे भारतात मृत्यू होत असल्याची नोंद सर्वेक्षणात आहे.
गोवरबाधित बालकाच्या संपर्कातील निरोगी व लसीकरण न झालेल्या साधारणपणे 90 टक्के मुलांना या आजाराचा धोका असतो. हे जंतू खोकला किंवा श्वसनसंस्थेतून बाहेर पडल्यावर हवेत जवळपास एक तास जिवंत राहू शकतात. त्यामुळे थेट संपर्क नसल्यावरही आजाराची शक्‍यता असते. जंतू शरीरात गेल्यावर गोवराची लक्षणे अंदाजे 3 ते 9 दिवसांनी दिसतात. हिवाळ्यात किंवा जानेवारी ते एप्रिल महिन्यात गोवराचे रुग्ण आढळतात. आरोग्य उपसंचालक कार्यालयात मंगळवार 28 ऑगस्ट रोजी बैठक झाली आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. समीर गोलावार, डॉ. हरीश अग्रवाल यांच्यासहित अनेकजण उपस्थित होते.
कमी प्रमाणात गोवर असलेल्या रुग्णाने जास्त वेळ आराम करणे, व्यवस्थित पाणी पिणे, वेळेवर औषधोपचार घेण्याने बरे वाटते. डोळ्याचा त्रास कमी करण्यासाठी त्या वेळी प्रकाशात जाणे टाळावे. आजार होऊ नये म्हणून आरोग्यदायी आहारासोबतच जीवनसत्त्व "अ'चे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने सेवन करावे.
-डॉ. अविनाश गावंडे, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ, नागपूर.

गोवर आजाराचे उच्चाटन करण्यासाठी वयाच्या 9 व्या महिन्यापासून तर 15 वर्षे वय असलेल्या मुलांना डोस देण्याचा उपक्रम शासनातर्फे सुरू करण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये मीझल्स, रुबेलावर जनजागरण करण्यात येणार आहे. नुकतेच आरोग्य विभागात यासंदर्भात बैठक झाली आहे. नोव्हेंबरापासून लसीकरण सुरू होईल.
-डॉ. समीर गोलावार, सहयोगी प्राध्यापक, मेडिकल, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com