Food Poisoning : वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहारातील खिचडीमुळे ५७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना विषबाधा झाली. एकूण ५९ जणांवर उपचार सुरू आहेत.
हिंगणघाट : तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार अंतर्गत दिल्या जाणाऱ्या खिचडीमुळे ५७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक असे एकूण ५९ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली.