तुमसर : तुमसर शहरातील सहा किराणा दुकानांचे शटर तोडून रोख रकमेसह साडेचार लाख रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना रविवार (ता.२२ ) रोजी पहाटे दोन वाजता शहरातील बोस नगर परिसरातील किराणा गल्लीत घडली..चोरट्यांनी शिवशंकर निखारे यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून ड्रॉवरमध्ये ठेवलेले चार लाख रुपये चोरून नेले. निखारे यांनी ही रक्कम कोणालातरी देण्यासाठी त्यांच्या दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती, जी चोरट्यांनी चोरून नेली..यानंतर, चोरट्यांनी मारुती सोनवणे यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून कॅश बॉक्समधून १० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. धान्य दुकानाचे मालक रोशन लांजेवार यांनी सांगितले की, त्यांच्या दुकानाचे शटर तोडले गेले आणि सात रुपये चोरीला गेले..Jalna News : ८७ वर्षांपर्यंत पंढरपूरची पायी वारी करणाऱ्या बळिराम महाराजांचे कार्य अनमोल.चोरट्यांनी हटवर किराणा स्टोअर नावाच्या दुकानाचे शटर तोडून ड्रॉवरमधून १००० रुपये रोख रक्कम चोरली. त्यानंतर त्यांनी रमेश सोनावणे यांच्या दुकानातून दोन चांदीची नाणी आणि १५०० रुपये चोरले. त्याच दरम्यान चंदनगिरी बाबा किराणा स्टोअरमधून २००० रुपये रोख रक्कम चोरीला गेली. या घटनेमुळे शहरातील दुकानदार आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले की, एकाच रात्री तुमसर शहरातील बोस नगर येथील किराणा चाळमधील सहा दुकानांचे शटर तोडून सुमारे साडेचार लाख रुपयांची चोरी झाली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.