
गडचिरोली : तालुक्यातील १०६ गावांपैकी ६४ गावांतून अवैध दारू हद्दपार झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी काही गावांना दोन, तीन तर ५ वर्षे झाली असून काही गावे १९९३ च्या दारूबंदी आंदोलनापासून गावे दारूविक्री मुक्त आहेत. मुक्तिपथ तालुका चमू, मुक्तिपथ गाव संघटना व पोलिस विभागाने केलेल्या कारवाईने हे शक्य झाले आहे. उर्वरीत गावांतूनसुद्धा दारू हद्दपार करण्यासाठी गाव संघटना सज्ज असून ४० गावांत मुक्तिपथ-शक्तिपथ महिलांच्या संघटना स्थापन करण्यात आल्या आहेत व विविध पद्धतीने प्रयत्न सुरू आहे.