संग्रामपूर - (बुलढाणा) तालुक्यातील सावळा (गट ग्रामपंचायत मारोड) येथील सामान्य कुटुंबातील एका तरूण मुलाने जिद्दीच्या जोरावर सायकलीने सात हजार किलोमीटर प्रवास करीत रामेश्वरम गाठले. तब्बल चार महिने तो सायकलीने प्रवास करीत निघाला होता. तरुणाच्या मनगटात कुठलेही ध्येय गाठण्याची ताकद असते. यासाठी त्याचे प्रयत्न, जिद्द, धाडस मात्र हवे असते.