esakal | 3 तासांत 70.5 मिमी पाऊस 
sakal

बोलून बातमी शोधा

कळमेश्वर ः गोवरी मार्ग असा जलमय झाला

3 तासांत 70.5 मिमी पाऊस 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळमेश्वर  (जि.नागपूर) : गेल्या 3 महिन्यांपासून कळमेश्वरसह परिसरातील नागरिक चांगल्या ठोस पावसाच्या प्रतीक्षेत असताना गेल्या 3 महिन्यांची कसर 3 तासांत पूर्ण केली. मंगळवारी (ता. 3) दुपारी 1.30 वाजतापासून 4.30 वाजेपर्यंत संततधार पडलेल्या पावसाने शहरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसून रस्ते जलमय झाले. कळमेश्वर तहसील कार्यालयात आज पडलेल्या पावसाची नोंद.70.5 इतकी झाली असून गेल्या 3 महिन्यांत 450.67 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 
मंगळवारी मुसळधार पडलेल्या पावसामुळे कळमेश्वर-गोवरी मार्गावरील नाल्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून येथे परिसरातील ग्रामस्थांनी या नाल्यावर पुलाची मागणी पालिकेकडे केली आहे. परंतु ती मागणी हवेतच विरली, तसेच पालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे आजच्या पावसाचा फटका घरात पाणी घुसल्यामुळे अनेक नागरिकांना बसला. विविध वस्त्या जलमय झाल्याने कळमेश्वर पालिका कर्मचारी तसेच मुख्याधिकारी स्मिता काळे, पालिका उपाध्यक्ष जोत्स्ना मंडपे यांनी भरपावसात पाहणी करून उपाययोजना केल्या. आज झालेल्या पावसाने कळमेश्वरातील दोन्ही नद्या पहिल्यांदाच ओसंडून वाहत होत्या. शेतकरी बांधवांनी या पावसाचे स्वागत केले. काही भाजीपाला सोडला तर हा पाऊस नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांचे मत आहे. 

loading image
go to top