
अमरावती: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, या निर्धाराने भर पावसातही हजारो शेतकऱ्यांनी ‘७/१२ कोरा कोरा’ यात्रेला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पापळ येथून प्रारंभ केला. सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसातही शेतकऱ्यांनी शेकडोच्या संख्येत या यात्रेत सहभाग नोंदविला.