Nagpur News: वृद्धाने विहिरीत उडी घेत जीवन संपवले; नवीन कामठी येथील घटना
Mental Health Awareness: कामठीच्या न्यू येरखेडा भागात ७७ वर्षीय सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. मृत्यूच्याआधी ते ‘कोणीतरी बोलावतंय’ असं म्हणत होते.
कामठी : नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरत टाऊन न्यू येरखेडा येथे सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.१०) दुपारी दोनच्या सुमारास घडली. अब्दुल गफ्फार अब्दुल हजीज (७७) असे मृताचे नाव आहे.