Senior Citizens : आठ लाख आजी-आजोबांची रविवारी परीक्षा; दीडशे गुणांचा होणार पेपर, नव भारत साक्षरता कार्यक्रमातून होणार साक्षर

Naya Bharat Saksharta : राज्यातील आठ लाख आजी-आजोबा नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शिक्षण घेत असून, येत्या रविवारी त्यांची परीक्षा होणार आहे. १५० गुणांच्या या परीक्षेसाठी मोठी उत्सुकता आहे.
Senior Citizens
Senior Citizenssakal
Updated on

अविनाश साबापुरे

यवतमाळ : दहावी-बारावीच्या परीक्षेतून नातवंडे मोकळी होताच आता घरातील निरक्षर आजी-आजोबांची परीक्षा होणार आहे. नव भारत साक्षरता कार्यक्रमातून शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या या प्रौढांची येत्या रविवारी (ता.२३) प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातून तब्बल आठ लाख प्रौढ या परीक्षेला बसणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com