Vidarbha Education : नऊ कोटींच्या थकित महागाईभत्ता वितरणात गैरव्यवहार; चौकशीसाठी पोलिस उपायुक्तांना विमाशि संघाचे निवेदन
Education News : बुलडाणा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ९ कोटी रुपयांच्या महागाई भत्त्याच्या वितरणात नियमबाह्य गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
द्रुगधामना : जिल्ह्यातील खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकित ९ कोटींच्या महागाई भत्त्याच्या वितरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केला आहे.