Car Accident
Car AccidentEsakal

Car Accident : चक्क हॉटेलात घुसली कार; एक गंभीर दोन जखमी

चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने घडली घटना
Published on

शेगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका हॉटेलात चक्क कार घुसली असून या अपघाताच्या घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला तर दोघांच्या डोक्याला मार लागला आहे. कारचालक हे महसूल विभागात निंबा तालुका बाळापूर येथे मंडळ अधिकारी असल्याचे समजले.

Car Accident
Nashik News : भरतीसाठी निवडणूक शाखेकडून मार्गदर्शन मागविले; ‘आरोग्यवर्धिनी’, आपला दवाखाना प्रकल्पासाठी कर्मचाऱ्यांची गरज

सदर घटना ही गुरुवारी दुपारी ४ वाजता सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या महितीनुसार एमएच २८एझेड०६७३ क्रमांकाची मारूती सुझुकी सेलेरिओ मॉडेलची कार महसूल विभागातील मंडळ अधिकारी गजानन नत्थुजी फिरके (वय अंदाजे ५७ वर्षे) हे चालवित असताना स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व परिणामी सदर कार ही हॉटेल सदानंद व मोहता ट्रेडर्स यांचे दुकानाच्या कॉर्नरवर जावून धडकली. तत्पूर्वी सदर कारची धडक एका दुचाकीला लागून दुचाकीवरील गजानन आनंदराव पातोंडे (वय अंदाजे ४०) व त्यांची पत्नी राजश्री गजानन पातोंडे (वय अंदाजे ३५) हे अकोला जिल्ह्यातील आगर येथील दांमपत्य खाली पडून जखमी झाले. यामध्ये दोघांच्याही डोक्याला मार लागला आहे. तसेच दुचाकीला धडक दिल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व कार सरळ हॉटेल सदानंद व मोहता ट्रेडर्स यांच्या दुकानाच्या कॉनरवर धडकली. या धडकेत मोहता यांच्या

दुकानात साहित्य खरेदीसाठी आलेला व ऑटोत बसलेल्या रामकृष्णा रामराव खेट्टे वय अंदाजे २७ वर्षे या युवकाच्या पायावर जाऊन धडकली. सदर युवकाच्या पायाला व डोक्याला गंभीर इजा झाली आहे. उपरोक्त तीघांनाही महेशसिंग मोहता यांच्या मदतीने समाजसेवक किशोर रणवरे यांनी तात्काळ जवळच्या सईबाई मोटे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असून उपचारानंतर युवकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तर घटनेची माहिती मिळताच चौकातील वाहतूक पोलिसांनी कार चालक निंबा महसूल मंडळ अधिकारी गजानन फिरके यांना पो.स्टे.ला नेले व त्यांची कार सुध्दा पो.स्टे.ला जमा केली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यावर पुढील कार्यवाही सुरू असल्याचे पोलीसानी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com