वानाडोंगरी (ता.हिंगणा) : राजीवनगर परिसरात वास्तव्यास असणारे व अमरनगर परिसरात भंगारचा व्यवसाय करणारे संतप्रसाद वर्मा हे एकदा न्यायालय परिसरात काही कामानिमित्त कुटुंबासोबत गेले होते..तेथे गणवेशात रुबाबदार दिसणाऱ्या वकिलांना त्यांनी पाहिले व आपल्या मुलीकडे बघून म्हणाले, मै भी एकदिन मेरे बेटिको ॲडव्होकेट बनाऊंगा. त्यांच्या मुलीने एका बापाचे स्वप्न ॲडव्होकेट होऊन नव्हे तर न्यायाधीश होऊन पूर्ण केले. त्या मुलीचे नाव आहे किरण संतप्रसाद वर्मा असे आहे..वानाडोंगरी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या राजीवनगर येथे राहणारे संतप्रसाद वर्मा यांची मुलगी किरण. हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी ) आणि जेएमएफसी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-२०२२ परीक्षा दिली. निकाल घोषित झाला. राजीवनगर या वसाहतीमध्ये राहणारी किरण संतप्रसाद वर्मा ही महाराष्ट्रात दहावी आली आहे..भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या संतप्रसाद वर्मा यांची मुलगी किरण ही लवकरच न्यायाधीश होणार आहे. त्यामुळे किरण आणि तिच्या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकूण ३४३ उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड झाली. २९ मार्चला शनिवारी अंतिम निकाल जाहीर झाला असून ११४ जणांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदासाठी निवड करण्यात आली आहे ..११४ उमेदवारामध्ये किरण वर्मा हिने दहावा क्रमांक प्राप्त केला आहे .किरण हिने सिव्हिल लाइन नागपूर येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर लाॕ-काॕलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. नंतर तिने पुण्यातील गणेश सिरसाट अॕकॕडमीमध्ये प्रवेश घेतला. किरणला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. दुसऱ्या क्रमांकाची राधिका ही इंजिनियर असून तिसरी रिंकी ही एमपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे..किरणचा निकाल जाहीर होताच परिसरातील नागरिकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु केला आहे. तसेच वानाडोंगरी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता, माजी पंचायत समिती सदस्या रेखा वर्मा, दिलीप गुप्ता, नंदकिशोर वर्मा, ज्योती पारसकर व चंदन वर्मा यांनी घरी जाऊन अभिनंदन केले..Nagpur Crime : मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवीगाळ करण्यास मनाई केल्याने ,युवकावर कुऱ्हाडीने वार.माझे बाबा माझ्याकडे पाहून म्हणाले होते की, मै भी मेरी बेटीको अॕडव्होकेट बनाऊंगा. माझ्या वडीलांनी फक्त वकील बनवण्याचे स्वप्न पाहिले होते .पण मी आज वकिलांची न्यायाधीश झाले आणि माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. माझ्या यशाचे श्रेय आईबाबा व अॕड.गणेश सिरसाट यांना आहे.-किरण वर्मा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.