

Buldhana
esakal
बुलडाणा: जिल्हा परिषद आणि १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘आयुष्मान भारत’ आणि ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ यांतर्गत प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस विमाकवच मिळवण्यासाठी ‘आभा’ (ABHA) कार्ड काढणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण उपसंचालक डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या आदेशा मुळे जिल्ह्यातील १९४० शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आभा कार्ड काढावे लागणार आहे.