

Success Story
sakal
प्रफुल्ल भंडारी / रमेश वत्रे
दौंड : सर्विसेस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षत सात वेळा अपयश आल्यानंतरही खचून न जाता लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न गिरीम ( ता. दौंड) येथील युवकाने मोठ्या जिद्दीने पूर्ण केले आहे. कुटुंबीयांचे पाठबळ, अपार परिश्रम आणि ध्येय गाठण्यासाठीची विलक्षण सहनशक्ती असलेल्या अभिजित फुलारी या शेतकरीपुत्राने २८१ प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नवव्या क्रमांकाला गवसणी घालत लेफ्टनंट पद संपादित केले आहे.