esakal | लोणार सरोवराबाबत कॉन्फरन्स रूममध्ये सुनावणी
sakal

बोलून बातमी शोधा

लोणार सरोवराबाबत  कॉन्फरन्स रूममध्ये सुनावणी

लोणार सरोवराबाबत कॉन्फरन्स रूममध्ये सुनावणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धनाशी संबंधित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कोर्ट रूममध्ये जागा कमी पडल्याने कॉन्फरन्स रूममध्ये या प्रकरणावर सुनावणी घ्यावी लागली. एखाद्या प्रकरणावर कॉन्फरन्स रूममध्ये सुनावणी घेण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बुलडाण्याचे जिल्हाधिकारी, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक, मेळघाट विभागाचे मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, मेहकरचे उपविभागीय अधिकारी, लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह एकूण 12 सरकारी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या सुनावणीदरम्यान प्रशासनाला न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी सरोवराच्या संवर्धनाशी निगडित अनेक सूचना दिल्या.
loading image
go to top