
राज्याची उपराजधानी आलेल्या नागपूर जिल्ह्यात बुधवारी पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पहिल्यांदाच ५ हजाराच्या वर गेला. नागपूर शहरात ३२८३, तर जिल्ह्यात २०५५ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले.
नागपूर : विदर्भात कोरोनाची लाट वेगाने पसरत असून बुधवारी पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांच्या संख्येने १० हजारांचा आकडा ओलांडला आहे, तर मृतांची संख्या १०० च्यावर पोहोचली आहे.
राज्याची उपराजधानी आलेल्या नागपूर जिल्ह्यात बुधवारी पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पहिल्यांदाच ५ हजाराच्या वर गेला. नागपूर शहरात ३२८३, तर जिल्ह्यात २०५५ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. नागपर जिल्ह्यातील मृतांचा आकडाही ६६ होता. नागपूरच्या पाठोपाठ भंडारा जिल्ह्यात कोरोनाने वेगाने हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. भंडारा जिल्ह्यात बुधवारी ११७७ जण पॉझिटिव्ह निघाले.
हेही वाचा - नितीन गडकरी यांचा इशारा कोणाला? गटबाजी फोफावल्याचे केले मान्य
विदर्भ : जिल्हानिहाय पॉझिटिव्ह (७ एप्रिल)
जिल्हा | पॉझिटिव्ह | मृत |
नागपूर | ५३३८ | ६६ |
वर्धा | ६८४ | ६ |
भंडारा | ११७७ | ९ |
गोंदिया | ५७१ | ६ |
चंद्रपूर | ६३७ | ५ |
गडचिरोली | १६० | ३ |
अमरावती | ३४४ | ४ |
यवतमाळ | ३५० | ८ |
अकोला | २६३ | ८ |
वाशीम | २६९ | २ |
बुलढाणा | ६२५ | २ |
एकूण | १०४१८ | ११९ |