Accident : गॅस टँकर व दुचाकीच्या धडकेत २७ वर्षीय युवक ठार

गॅस टँकर व दुचाकीच्या धडकेत एक २७ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना नागपूर संभाजीनगर या द्रुतगती मार्गावरील कारली फाट्या जवळ घडली.
 accident
accident sakal

कारंजा (जि. वाशीम) - गॅस टँकर व दुचाकीच्या धडकेत एक २७ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना ३१ ऑगस्टला दुपारी अडीच वाजता च्या दरम्यान नागपूर संभाजीनगर या द्रुतगती मार्गावरील कारली फाट्या जवळ घडली. गजानन नामदेव हाके असे मृत्यू पावलेल्या दुचाकी चालकाचे नाव असून तो कारंजा तालुक्यातील तुळजापूर येथील रहिवासी होता.

प्राप्त माहिती नुसार एम एच 29 बी एस 8617 क्रमांकाच्या दुचाकीने मृत युवक दोनद वरून कारंजा कडे येत असतांना मार्गातील अपघात स्थळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या गॅस टँकरने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे दुचाकी चालक खाली पडून त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि वाहतूक सुरळीत केली. दरम्यान वृत्त लिहेस्तोवर अपघाताच्या घटनेच्या पोलिसातील सविस्तर नोंदी बाबत माहिती प्राप्त झाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com