esakal | अमरावती-चांदूररेल्वे मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

accident on amravati to chandur railway line, both killed

काकडे कुटुंबीय एमएच २७ एडब्यू १४५७ क्रमांकाच्या दुचाकीने अमरावतीवरून वर्धेला तर, अनिल मेश्राम हे एमएच ३२ व्ही ४६०७ क्रमांकाच्या दुचाकीने चांदुररेल्वे वरून अमरावतीकडे येत होते. 

अमरावती-चांदूररेल्वे मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : अमरावती ते चांदूररेल्वे मार्गावरील बासलापूर फाट्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर, महिलेसह एक चिमुकला असे दोघे गंभीर जखमी झाले. आशिष चंद्रकांत काकडे (वय ३६, रा. रामनगर, वर्धा) व अनिल सुधाकर मेश्राम (वय ३२, रा. शिवणी रसुलापूर, नांदगावखंडेश्वर) अशी अपघातातील मृतांची नावे असल्याचे पोलिस निरीक्षक मगन मेहते यांनी सांगितले. 

अपघातात काकडे यांच्या पत्नी राणी आशिष काकडे (वय २८) व मुलगा शिवांश आशिष काकडे (वय ३ वर्षे, रा. रामनगर, वर्धा) हे जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (ता. २३) दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. काकडे कुटुंबीय एमएच २७ एडब्यू १४५७ क्रमांकाच्या दुचाकीने अमरावतीवरून वर्धेला तर, अनिल मेश्राम हे एमएच ३२ व्ही ४६०७ क्रमांकाच्या दुचाकीने चांदुररेल्वे वरून अमरावतीकडे येत होते. 

क्लिक करा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडे यांची दुचाकी रॉंग साइडने होती. तर मेश्राम योग्य दिशेने येत होते. दोन्ही दुचाकी वेगात असल्याने जोरदार धडक झाली. त्यात दुचाकीवरील सर्वच जण दूर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यापैकी श्री. मेश्राम यांचा जागेवरच मृत्यू झाला. काकडे दाम्पत्यासह चिमुकल्यास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

येथे उपचारादरम्यान श्री. काकडे यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. अपघातात दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला. प्रकरणी चांदुररेल्वे पोलिसांनी वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली. असे पोलिस निरीक्षक श्री. महते यांनी सांगितले. 

संपादन : अतुल मांगे 

loading image
go to top