टॅंकरची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

हिंगणा - भरधाव जाणाऱ्या सिमेंट मिक्‍सर टॅंकरने दोन दुचाकीला उडविले. या अपघातात  दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. एक दिवस उलटूनही टॅंकर चालकाला अटक न केल्यामुळे पोलिसांविरोधात संतप्त किन्ही (धानोली)व मांगलीच्या ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर रविवारी(ता.१) सकाळी आंदोलन सुरू केले. 

हिंगणा - भरधाव जाणाऱ्या सिमेंट मिक्‍सर टॅंकरने दोन दुचाकीला उडविले. या अपघातात  दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. एक दिवस उलटूनही टॅंकर चालकाला अटक न केल्यामुळे पोलिसांविरोधात संतप्त किन्ही (धानोली)व मांगलीच्या ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर रविवारी(ता.१) सकाळी आंदोलन सुरू केले. 

हिंगणा येथे काम करणारे चौघे जण शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास किन्ही (धानोली) व मांगली गावांकडे दुचाकीने जात होते. भरधाव टॅंकरने दुचाकी व आणखी दुसऱ्या दुचाकीला जबर धडक देऊन मांगली गावाजवळ उडविले. अपघातात प्रमोद गणपत बोचर (३५, किन्ही) व अमर गोविंदा उईके (१८, मांगली) यांचा मृत्यू झाला. गणवीर खंदारे (२२) व देवलाल खंदारे (६५) गंभीर जखमी झाले. 

पोलिसांनी एक दिवस लोटूनही टॅंकर चालकाला अटक केली नव्हती. यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी मृतांची उत्तरीय तपासणी सुरू असताना ग्रामीण रुग्णालयासमोर पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त केला. यामुळे हिंगणा व वाडी येथील पोलीसांचा ताफा तैनात करण्यात आला.  मेटाउमरी येथील खाण मालकाकडून आर्थिक मदत मिळेस्तोवर शव नेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग, काँग्रेसचे नेते बाबा आष्टणकर, जि. प. सदस्य उज्ज्वला बोढारे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, उपसरपंच विनोद उमरेडकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर सहाय्यक पोलिस उपायुक्त सिद्धार्थ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

सहाय्यक पोलिस उपायुक्तांना घेराव
हिंगणा ग्रामीण रुग्णालयासमोर अपघातातील मृतांचे शवविच्छेदन सुरू असताना आंदोलनकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयासमोर पोलिसांविरुद्ध नारेबाजी सुरू केली. दचर्चेत समाधानकारक तोडगा न निघाल्याने उपायुक्तांना आंदोलनकर्त्यांनी घेराव घालून पोलिसांविरोधात घोषणा दिल्या. यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र, उपायुक्त आंदोलनकर्त्यांच्या गराडातून बाहेर पडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident death agitation crime