esakal | हृदयद्रावक! रस्ता ओलांडताना आजोबा-नातीचा भीषण अपघात; तब्बल ५० फुटांवर मिळाला मृतकाचा पाय 
sakal

बोलून बातमी शोधा

Accident of Grandfather and grand daughter in Bhandara district

सुखदेव विठोबा लांजेवार (वय ७0) व कृतिका ओमदेव लांजेवार (वय ६) दोघेही रा. पिंपळगाव/ सडक ता. लाखनी अशी मृतकांची नावे आहेत. अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर मृतकाचा पाय तुटून ५0 फूट अंतरावर जाऊन पडला होता.

हृदयद्रावक! रस्ता ओलांडताना आजोबा-नातीचा भीषण अपघात; तब्बल ५० फुटांवर मिळाला मृतकाचा पाय 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लाखनी (जि. भंडारा) : राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव / सडक येथे रस्ता ओलांडणार्‍या आजोबा व नात यांना भरधाव व्हॅगनार कारने धडक दिली. या अपघातात आजोबासह चिमुकली नात यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ६) सकाळी ७ वाजता घडली. अपघातानंतर व्हॅगनार चालक वाहनासह पसार झाला.

सुखदेव विठोबा लांजेवार (वय ७0) व कृतिका ओमदेव लांजेवार (वय ६) दोघेही रा. पिंपळगाव/ सडक ता. लाखनी अशी मृतकांची नावे आहेत. अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर मृतकाचा पाय तुटून ५0 फूट अंतरावर जाऊन पडला होता. लाखनी पोलिसांनी अज्ञात व्हॅगनार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शोधाकरिता दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा - धक्कादायक! बापच निघाला नवजात बाळाचा मारेकरी; शौचालयात आढळले होते अर्भक

सुखदेव लांजेवार हे नात कृतीकासह दररोज सकाळच्या सुमारास फिरावयास जात असत. नित्यनेमाप्रमाणे आजही गेले होते. घराकडे परतण्यासाठी हनुमान मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडीत असतांना साकोलीकडून भंडाराकडे भरधाव जाणार्‍या पांढर्‍या रंगाच्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्ता ओलांडणार्‍या सुखदेव व कृतीका यांना धडक दिली. 

यात सुखदेव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कृतीका गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा - देशाचे हृदयस्थळ राहण्यायोग्य शहराच्या यादीत २५ व्या स्थानावर; सोलापूरही नागपूरच्या समोर

कारच्या शोधार्थ दोन पथके तयार करून तपासकामी पाठविण्यात आले. पण कारधा / भंडारा टोल नाका या व्हॅगनार कारने ओलांडला नसल्याने पत्ता लागला नसल्याची माहिती आहे. तपास पोलिस निरीक्षक मनोज वाडीवे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय कोरचे, अंकुश गाढवे करीत आहेत. ज्याठिकाणी हा अपघात झाला त्याचठिकाणी काही दिवसांपूर्वी लग्नाचे वर्‍हाड घेवून जाणार्‍या ट्रॅव्हल्सने हनुमान मंदिरास धडक दिल्याने १ ठार तर १९ वर्‍हाडी गंभीर जखमी झाले होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image