आडवा आला डुकरांचा कळप; विचित्र अपघातात चिमुकल्यासह एक ठार; 10 जखमी

आडवा आला डुकरांचा कळप; विचित्र अपघातात चिमुकल्यासह एक ठार; 10 जखमी

वर्धा : रस्त्याने जात असताना डुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या विचित्र अपघातात चिमुकल्यासह अन्य एक ठार झाला. हा अपघात शनिवारी (ता. १२) रात्री ११ वाजताच्या सुमारास वर्धा-यवतमाळ मार्गवर झाला.

आडवा आला डुकरांचा कळप; विचित्र अपघातात चिमुकल्यासह एक ठार; 10 जखमी
म्हणाले 'पवार-मलिकांचे दाऊदशी संबंध'; राणे बंधूंवर आणखी एक गुन्हा दाखल

पिबी 10 एफ क्रमांकाची कार यवतमाळ कडून येत होती. त्या कारला डुकरांचा कळप आडवा गेल्याने चालकाने तातडीने ब्रेक मारला. यात एक डुकराला धडक बसली. याच दरम्यान जात असलेल्या दुचाकी चालकाने अपघातग्रस्तांना मदत करण्याकरिता रस्त्यावर दुचाकी थांबविताच दुसऱ्या भरधाव कारणे त्याला आणि उभ्या असलेल्या कारला धडक दिली. यात दुचाकी चालकासह एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. या अपघातात सुमारे 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com