ब्रेकिंग: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कंत्राटदाराच्या टिप्परने दिली दुचाकीला धडक; दोघे गंभीर जखमी 

सायराबानो अहमद 
Tuesday, 15 December 2020

मिळालेल्या माहिती नुसार असे की,एम.एच.४०-१३२७ हा टिप्पर बांधकाम साहित्य घेऊन निंबोली कडून धामणगावकडे येत असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या किशोर सुखदेव भिडे (३२) रा.नाचणगाव (जि.वर्धा) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) :  नागपूर - मुंबई समृद्धी सुपर एक्स्प्रेस हायवेचे काम सुरू आहे. या कामावरील कंत्राटदाराच्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वारासह दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील निंबोली गावाजवळ मंगळवारला (ता.१५) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

नक्की वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

मिळालेल्या माहिती नुसार असे की,एम.एच.४०-१३२७ हा टिप्पर बांधकाम साहित्य घेऊन निंबोली कडून धामणगावकडे येत असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या किशोर सुखदेव भिडे (३२) रा.नाचणगाव (जि.वर्धा) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी चालकासह दोन जण जखमी झाले. जखमींना प्रथम धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात अधिक उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या प्रकरणाची मंगरूळ दस्तगीर नोंद घेतली आहे.

समृद्धीची सैराट वाहतूक थांबणार कधी?

नागपूर-मुंबई सुपर एक्सप्रेस मार्ग लवकर तयार करण्याच्या नादात समृद्धी महामार्ग कंत्राटदाराची गौण खनिज, विटा रेतिच्या टिप्परची दिवस-रात्र सैराट वाहतू महामार्गाच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून सुरू आहे. रात्रीच्या वेळी सुसाट वेगाने धावणारे टिप्पर समोरून येणाऱ्या वाहनांना अप्पर - डीप्पर लाईट देत नसल्याने समोरच्या वाहनचालकास लक्ख उजेडामुळे काहीच दिसत नाही.याच कारणांनी यापूर्वीहीअनेक अपघात झाले आहेत.

हेही वाचा - अंकिता जळीतकांड : पहिल्याच दिवशी आरोपीचे वकील गैरहजर; गुरुवारी देतील आरोपावर उत्तर

सदर प्रकारावर आळा घालण्याची जबाबदारी पोलिस विभागाची असताना पोलिस विभाग मात्र समृद्धी महामार्गासाठी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांची  जबाबदारी असल्याचे सांगून मोकळे होतात. कारवाईचा होत नसल्याने मोकाट सुटलेल्या समृद्धी महामार्ग कंत्राटदाराची ही बेफाम वाहतूक आणखी किती अपघात घडवेल ? हा प्रश्न मात्र यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Samrudhhi Highway two injured