वृत्तपत्र घेऊन जाणाऱ्या टॕक्सीचा अपघात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

अपघातात टॅक्सीतून प्रवास करणारा अकोल्याचा प्रेरणा (वय 35) नामक तृतीयपंथी जागीच ठार झाला. खामगाव येथील रहिवासी तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असणारे मोहम्मद सादीक अब्दूल समद (वय 47) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

मूर्तिजापूर : येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग सहावरील कोहिनूर फाट्याजवळ शनिवारी (ता.18) सकाळी चार वाजताच्या दरम्यान नागपूर वरून अकोल्याकडे येणाऱ्या वृत्तपत्र वाहक टॕक्सी उभ्या ट्रॅक्टरला धडकल्याने भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर तीघे जखमी झाले आहेत.

हे वाचा - सावधान...बनावट नोटा चलनात आल्या
दोघांचा मृत्यू
नागपूर वरून अकोल्याकडे वृत्तपत्र घेऊन येणारी टॅक्सी क्रमांक एम. एच. 49 एफ. 0549 उभ्या अपघातग्रस्त ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. 30 जे. 9623 ला धडकली. या अपघातात टॅक्सीतून प्रवास करणारा अकोल्याचा प्रेरणा (वय 35) नामक तृतीयपंथी जागीच ठार झाला. खामगाव येथील रहिवासी तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असणारे मोहम्मद सादीक अब्दूल समद (वय 47) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

क्लिक करा - जिल्हा परिषदवर पुन्हा भारिपची सत्ता
हे तिघे जखमी
तर यामध्ये एक तृतीयपंथी इरफान, शिक्षक एनूल्ला शेख व ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई नितिन चुडे असे तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. ठाणेदार दत्तात्रय अव्हाळे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident in a taxi carrying a newspaper