दुचाकीसाठी लग्न मोडल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : वधूपक्षाला खोटी माहिती देऊन साक्षगंधाला वधूच्या आभूषणासाठी 1 लाख रुपये घेतल्यानंतर पुन्हा दुचाकीची मागणी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह अमरावती येथील पाच जणांवर दत्तापूर पोलिस ठाण्यात शनिवारला (ता.21) फसवणुकीसह हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : वधूपक्षाला खोटी माहिती देऊन साक्षगंधाला वधूच्या आभूषणासाठी 1 लाख रुपये घेतल्यानंतर पुन्हा दुचाकीची मागणी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह अमरावती येथील पाच जणांवर दत्तापूर पोलिस ठाण्यात शनिवारला (ता.21) फसवणुकीसह हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.
तालुक्‍यातील हिंगणगाव येथील एका मुलीचा विवाह अमरावती शहराच्या पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस निरीक्षक राजकरणसिह बघेल यांचा मुलगा अंकुश बघेल याच्यासोबत जुळला होता. वधूपक्षाकडे 12 मे रोजी साखरपुडा समारंभ झाला. वरपक्षाने लग्नसोहळ्यासाठी वधूकरिता आभूषण बनवून भेट म्हणून देण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली. वधूपक्षाची इच्छा नसतानाही नाइलाजास्तव वधूच्या आईने रक्कम मुलीला भेट म्हणून वरपक्षाला दिली. त्याच दिवशी 17 जूनला लग्नाचे ठरले. वधूपक्षाने लग्नाची संपूर्ण तयारी केली. 21 मे रोजी अमरावती येथून वरपक्षाकडील मंडळी हिंगणगाव येथे आली. त्यांनी दुचाकीसाठी 72 हजार रुपये हुंड्याची मागणी केली. यावेळी वधूपक्षाकडून ही मागणी पूर्ण होऊ शकत नसल्याचे सांगितल्याने तुम्ही दुचाकीसाठी पैसे न दिल्याने वरपक्षाकडील मंडळी निघून गेली. परतलेल्या बघेल कुटुंबाने फोनवरूनच दुचाकीसाठी जुळलेले हे लग्न मोडले असल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबाला या प्रकाराने चांगलाच धक्का बसला. सविस्तर माहिती घेतली असता वराच्या लग्न परिचयपत्रावरील नोकरीसंदर्भात व इतर माहिती खोटी आढळून आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे वधुमंडळीला लक्षात आल्याने मुलीच्या आईने शनिवारला दत्तापूर पोलिसात तक्रार दाखल केली. प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी राजकरणसिह हनुमानसिह बघेल, अंकुश राजकरणसिह बघेल, मधुबाला राजकरणसिह बघेल, प्रमोद हनुमानसिह बघेल, किरण प्रमोद तोमर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. अधिक तपास दत्तापूर पोलिस करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused of breaking into marriage for two-wheeler