गोंदियात सामूहिक हत्याकांड! तिघांची हत्या करत आरोपीने स्वत:लाही संपवलं

Crime
CrimeSakal

गोंदिया : एकाच कुटुंबातील तिघांचा खून करून आरोपीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी (gondia murder case) येथे ही घटना घडली. यामध्ये हत्या झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील असून हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Crime
२१ दिवसांचा संसार पाण्यात बुडाला, नवदाम्पत्याला एकाच सरणावर निरोप

रेवचंद डोंगरु बिसेन (वय 51), मालता रेवचंद बिसेन (वय 45), पौर्णिमा रेवचंद बिसेन (वय 20), तेजस रेवचंद बिसेन (वय 17) अशी मृतांची नावे आहेत. आज सकाळ बिसेन कुटुंबीय घराबाहेर दिसले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी केली असता तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले, तर एकाचा मृतदेह लटकलेला होता. त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच खुनाचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com