अत्याचारप्रकरणी आरोपीला दहा वर्षे शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

यवतमाळ : व्हिडिओ नेटवर टाकण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षे शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी शनिवारी (ता.17) दिला.

यवतमाळ : व्हिडिओ नेटवर टाकण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षे शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी शनिवारी (ता.17) दिला.
मंगेश शंकर दगडे (वय 27, रा. भिडी, ता. देवळी, जि. वर्धा), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तीन एप्रिल 2015 ला दुपारी दुपारी दोनला मंगेश लग्नाची पत्रिका देण्याच्या उद्देशाने महिलेच्या घरी आला. यापुढे भेटण्याचा प्रयत्न केल्यास पतीला नाव सांगेल, असे महिला म्हणाली. त्यानंतर चार एप्रिलला तरुण बाभूळगाव बसस्थानकावर आला. तू भेटण्यासाठी न आल्यास व्हिडिओ पतीला दाखवील तसेच नेटवर टाकण्याची धमकी दिली. महिला भेटण्यासाठी गेली असता, तिला दुचाकीवर बसवून हस्तापूर शिवारातील शेतात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. त्याने पीडितेला परत बसस्थानकावर आणून सोडून दिले. ही बाब पीडितेने पतीला सांगून बाभूळगाव पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्घ गुन्हा नोंद केला. पोलिस निरीक्षक महिपालसिंह चांदा यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविस्ट केले. न्यायालयात चार साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित व डॉक्‍टरांची साक्ष ग्राह्य पकडण्यात आली.
विविध कलमान्वये कैद
भांदवि कलम 376 नुसार दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे कैद, कलम 366नुसार सात वर्षे शिक्षा व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, कलम 506 नुसार दोन वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कैद, अशी विविध कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused is sentenced to ten years for torture