Gondia News : पेट्रोल टाकून तिघांचा जीव घेणाऱ्या आरोपीस फाशी; गोंदिया जिल्हा न्यायालयाचा निकाल

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलगा व सासऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
accused who killed three people by pouring petrol to be hanged judgment of gondia district court
accused who killed three people by pouring petrol to be hanged judgment of gondia district courtSakal

Gondia News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलगा व सासऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. हा निर्वाळा गुरुवारी (ता. ९) दिला.

किशोर श्रीराम शेंडे (रा. भिवापूर, ता. तिरोडा) असे आरोपीचे नाव आहे. ही हृदय हेलावून टाकणारी घटना मागील वर्षी अर्थात १४ फेब्रुवारी २०२३ रोजी गोंदिया येथील सूर्याटोला भागात घडली होती.

आरोपी किशोर शेंडे हा पत्नी आरती (वय ३०) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा नेहमी छळ करीत होता.त्यामुळे पतीच्या जाचाला कंटाळून आरती फेब्रुवारी २०२३ मध्ये ही जय (वय ४) या मुलासह भिवापूर येथून माहेरी सूर्याटोला येथे आली होती. दरम्यान, १४ फेब्रुवारी २०२३ ला आरोपी किशोर शेंडे हा भिवापूरवरून दुचाकीने (एमएच ३५/ झेड. ९७०४) एका कॅनमध्ये पेट्रोल घेऊन सूर्याटोला येथे आला.

रात्रीची वेळ बघून त्याने घरावर पेट्रोल ओतले. तसेच पत्नी ज्या खोलीत झोपली होती तिथेही पेट्रोल टाकून घराला आग लावली. या आगीत सासरे देवानंद सितकू मेश्राम (वय ५२), आरती किशोर शेंडे (वय ३०) व जय किशोर शेंडे (वय ४) या तिघांचा जळून मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करीत आरोपी किशोरला १६ फेब्रुवारी २०२३ रोजी अटक केली होती. तसेच प्रकरणाचा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. या प्रकरणाची सुनावणी ७ मे रोजी पूर्ण होऊन न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी पुरावे व साक्ष तपासून आरोपीला दोषी ठरविले.

दरम्यान, गुरुवारी (ता. ९) या प्रकरणाचा निर्वाळा करीत भादंवि कलम ३०२ अंतर्गत फाशीची शिक्षा, कलम ४३६ अन्वये आजन्म कारावास व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विजय कोल्हे यांनी बाजू मांडली. रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार देवानंद काशिकर यांनी काम पाहिले.

म्हणून नात आणि आजी बचावली...

सूर्याटोला येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने समाजमन हेलावून गेले होते. देवानंद मेश्राम, आरती व जय यांचा मृत्यू झाला होता, तर मुलगी स्वरांजली ही घटनेच्या दिवशी आपल्या आत्याकडे झोपायला गेली होती. आरतीची आई ममता मेश्राम या त्यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी झोपल्या असल्याने या दोघेही या घटनेतून बचावल्या.

जिल्ह्यात पहिलीच फाशीची शिक्षा

जिल्ह्यात पहिलीच फाशीची शिक्षा भंडारा जिल्ह्याच्या फाळणीनंतर गोंदिया जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, हे यात उल्लेखनीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com