एका आदेशाने तीन नर्सचे कुटुंब आले रस्त्यावर

Action against Supervisors who use the residence of Class Two officers in akola
Action against Supervisors who use the residence of Class Two officers in akola

अकोला : देशभरात कोरोनाची संचारबंदी असताना अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या एका आदेशाने तीन अधिपरिचारीकांचे कुटुंब रस्त्यावर आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता.27) घडला आहे. तर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने कोणी भाड्याने घरही देत नसल्याचे वास्तव आहे.

गोरक्षण रोड स्थित नेहरुपार्क समोर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवास स्थान आहेत. जवळपास सहा ते सात वर्षांपूर्वी तत्कालीन अधिष्ठाता बोभाटे यांनी मनिषा इंगोले, चंदा भागवत आणि ममता डोंगरदिवे (शहा) या तिन्ही अधिपरिचारीकांना निवासस्थान उपलब्ध करुन दिले होते. डॉक्टर मागणी करतील त्यावेळेस निवासस्थान रिक्त करुन देणार असल्याचे लिहून दिले होते. परंतु, हे निवासस्थान वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांसाठी असून, चुकीच्या पद्धतीने वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी तिन्ही अधिपरिचारिकांना निवास्थान रिक्त करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा म्हणून औषधवैद्यकशास्त्र व शल्यचिकीत्साशास्त्र विषयातील अध्यापकांना हे निवास स्थान दिले जाणार असल्याचे आदेशात मकारण सांगितले. बाहेर कोरोनाच्या संचारबंदी असताना अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी घेतलेल्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

तर इतरांसाठी कायदा का नाही?
बाहेर संचारबंदी असताना नियमबाह्य म्हणून निवास स्थान खाली करण्याचे आदेश दिले जातात. पण, ग्रंथपाल यांच्यासह अधिष्ठातांच्या वाहन चालकांसाठी कायदा लागू होत नाही का? असा सवाल यावेळी बेघर झालेल्या अधिपरिचारीकांनी उपस्थित केला.

बदलीनंतरही ते कुटुंब निवास्थानातच
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली इतर जिल्ह्यांमध्ये झाली आहे. असे असतानाही, त्यांना येथील निवासस्थानाचा उपभोग घेत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली.

पर्यायी व्यवस्था नाही
निवासस्थान रिक्त करण्याचे आदेश देत असताना पर्यायी व्यवस्था दिली नाही. शिवाय, कोरोनामुळे कोणी भाड्याने घरही देत नसल्याने आम्ही रस्त्यावर आल्याचे अधिपरिचारीकांनी सांगितले. शिवाय, सर्वत्र कोरोनाचा संसर्ग असल्याने चिमुकल्यांना काही झाल्यास त्याला जबाबदार अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे राहणार असल्याचे त्यांनी बोलताना म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com