esakal | ...अन्‌ स्वतःच्या तेरवीपूर्वीच परतला रामभक्त, जाणून घ्या काय झाला होता प्रकार...
sakal

बोलून बातमी शोधा

Activists from Bhandara district had gone to Ayodhya for car service

अयोध्या येथे श्रीराम मंदिरावरून सुरू असलेल्या वादामुळे 1990 मध्ये देशभरातून कारसेवक मंदिर बांधण्याचा निश्‍चय करून रवाना झाले. जिल्ह्यातील 200 कार्यकर्त्यांसोबत 21 ऑक्‍टोबर 1990 ला संघाचे तालुका सहकार्यवाह असलेले पहेला (चोवा) येथील सुभाष आजबले अन्य स्वयंसेवकांसोबत गोंदिया-बालाघाट जबलपूरमार्गे अलाहाबादला गेले. संजय मते, योगेश बांते, रामदास शहारे, सुभाष आजबले असे सर्व कारसेवक स्वतःचे तिकीट काढून रेल्वेने प्रवास करत होते.

...अन्‌ स्वतःच्या तेरवीपूर्वीच परतला रामभक्त, जाणून घ्या काय झाला होता प्रकार...

sakal_logo
By
दीपक फूलबांधे

भंडारा  : अयोध्या येथे कारसेवेसाठी भंडारा जिल्ह्यातील बरेच उत्साही युवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप व बजरंग दलाचे कार्यकर्ते गेले होते. त्यावेळी अलाहाबाद येथे पुलावर पोलिसांनी अडवल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यात कित्येकांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातून गेलेले सर्वच परत आले. परंतु, जे आले नाही, त्यांना कुटुंबासोबत संपर्क साधता आले नाही. त्यामुळे पहेला येथील आजबले कुटुंबीयांनी मृत समजून तेरवीचे आयोजन केले. मात्र, तुरुंगातून सुटलेला रामभक्त सुभाष आजबले तेरवीपूर्वीच गावी परत आले, असा चित्तथरारक घटनाक्रमाबद्दल ते आजही तेवढ्याच उत्साहाने सांगतात.
 
अयोध्या येथे श्रीराम मंदिरावरून सुरू असलेल्या वादामुळे 1990 मध्ये देशभरातून कारसेवक मंदिर बांधण्याचा निश्‍चय करून रवाना झाले. जिल्ह्यातील 200 कार्यकर्त्यांसोबत 21 ऑक्‍टोबर 1990 ला संघाचे तालुका सहकार्यवाह असलेले पहेला (चोवा) येथील सुभाष आजबले अन्य स्वयंसेवकांसोबत गोंदिया-बालाघाट जबलपूरमार्गे अलाहाबादला गेले. संजय मते, योगेश बांते, रामदास शहारे, सुभाष आजबले असे सर्व कारसेवक स्वतःचे तिकीट काढून रेल्वेने प्रवास करत होते. अलाहाबाद येथे रेल्वे स्टेशनवर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना एका शाळेत आणले. तेथे अटक केलेले लाखो लोकांना ठेवले होते. शेवटी कारसेवकांची संख्या वाढल्याने त्यांनी पोलिसांना न जुमानता लालजी टंडन यांच्या नेतृत्वात  विशाल मोर्चा काढून अयोध्येकडे कुच केली. 

पोलिसांनी गंगेच्या पुलावर दोन्ही बाजूंनी कारसेवकांवर अमानुष हल्ला केला. समोर किंवा मागे जाण्यासाठी मार्ग नसल्याने काही कारसेवकांनी गंगेत उड्या घेतल्या. पोलिसांच्या लाठीमारात बऱ्याच मोठ्या प्रमाणात कारसेवक जखमी झाले. उर्वरित लोकांनी पोलिसांचा मार खाऊन अटक करवून घेतली.

जाणून घ्या - घरात सापडलेली तांब्याची वस्तू निघाली तब्बल 1500 वर्ष जुनी; इतिहास बघितला आणि सर्वांनाच बसला धक्का..
 

त्यांना पोलिसांनी तात्पुरत्या कारागृहात आणले. अलाहाबाद येथील रस्त्यावर ट्रक भरून कारसेवकांच्या चपला-जोडे मिळाले होते. या घटनेमुळे देशभरात सरकार व पोलिसांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता. या घटनेत सोबत आलेले सगळे इकडे तिकडे गेल्याने सोबत कोणीही नव्हते.

सुभाष आजबले यांना अटक झाल्यावर कुटुंबीयांसोबत पत्रव्यवहार किंवा फोनद्वारे संपर्क साधता आला नाही. शेकडो कारसेवकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या टीव्ही व वृत्तपत्रातून दररोज येत होत्या. त्यामुळे पहेला येथील त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते. जिल्ह्यातून कारसेवेला गेलेले स्वयंसेवक मिळेल त्या साधनाने गावाकडे परत येत होते. परंतु, एक महिला लोटला पण, सुभाषभाऊ आलेच नाही. त्यांमुळे कुटुंबीयांनी त्यांची तेरवी करण्याचे ठरवले.  

तिकडे अटकेतील कारसेवकांना अलाहाबादवरून फत्तेगड कारागृहात व नंतर फैजाबाद येथे हलविण्यात आले. यात जवळपास एक महिन्याला कालावधी गेला. त्यानंतर सुटका झाल्यानंतर ते अयोध्येला गेलो. तिथे शरयू नदीच्या पात्रातून बाहेर काढलेल्या मृतदेहांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करताना त्यांनी पाहिले. त्यानंतर रामलला ठिकाणाचे दर्शन घेऊन ते गावाकडे परत आले. गावी आले तेव्हा कुटुंबीयांनी त्यांच्या तेरवीसाठी तयारी करताना दिसून आले. सुभाषभाऊ परत आल्याने कुटुंबीयांनी आनंदाने मिठी मारली असे ते सांगतात. यानंतर 1992 ला सुद्धा अयोध्येला गेल्याचे त्यांनी सांगितले. 

बलिदान फळाला आले


तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी अयोध्येत एकालाही येऊ देणार नाही, अशी शपथ घेतली होती. परंतु, देशभरातून आलेल्या रामभक्तांनी त्यांच्या गर्वाचे हरण केले. शेकडो रामभक्तांनी अयोध्येतील राममंदिरासाठी वेळोवेळी बलिदान केले आहे. त्यांच्या बलिदानामुळेच राममंदिराचे स्वप्न साकार होत आहे. हे राममंदिर पाहण्याचा योग्य यावा, असे श्री आजबले यांनी सांगितले.