चंद्रपूर - चंद्रपूर वाघाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही टायगर्स कॅपिटल आहे. यामुळे सेलिब्रेटींना येथील वाघांची भूरळ पडत आहे. राज्याचे माजी वनमंत्री व बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन यांना बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा येथे जंगल सफारी घडविली. या दरम्यान रविना टंडन यांना इरिना वाघिणीचे दर्शन घडले.