Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा
Water Level Update : गेल्या आठवड्यातील पावसामुळे अडाण धरणातील पाणीसाठ्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या साठा ४५.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तरीही कारंजा शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.
कारंजा: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अडाण धरणातील पाणीसाठ्यात मागील काही दिवसांच्या पावसामुळे ४ टक्क्यांनी वाढ झाली. आठवडाभरापूर्वी धरणात ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.