
आदर्श साईनाथ माष्टे याने हिमाचल प्रदेशातील मनाली येथील ग्रीन व्हॅली ऍडव्हेंचर गृपतर्फे आयोजित हिमालय पर्वतातील धौलाधार पर्वत रांगामधील माउंट पतालसू नावाचे चार हजार 4220 मीटर ऊंचीचे पर्वत यशस्वीपणे सर केले.
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर ) : आदर्श साईनाथ माष्टे या तरुणाने मनाली येथील चार हजार 4220 मीटर उंच शिखर सर केले. महाराष्ट्रातून केवळ दोन तरुणांनी ही कामगिरी बजावली. पर्वतरांगा सर केल्यानंतर तिरंगा फडकवित आदर्शने मोहिम फत्ते केली. गोंडपिपरी तालुक्यात आदर्शच्या कामगिरीची माहिती कळताच अनेकांनी अभिनंदन करीत कौतुक केले.
हेही वाचा - महाराष्ट्र दिनापासून नागपूर-शिर्डी वाहतूक; बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या...
परिवारातील थोरामोठ्यांकडून मिळालेला आदर्श घेत गोंडपिपरी शहरातील आदर्श साईनाथ माष्टे याने हिमाचल प्रदेशातील मनाली येथील ग्रीन व्हॅली ऍडव्हेंचर गृपतर्फे आयोजित हिमालय पर्वतातील धौलाधार पर्वत रांगामधील माउंट पतालसू नावाचे चार हजार 4220 मीटर ऊंचीचे पर्वत यशस्वीपणे सर केले. असे करत त्याने युवा पिढीपुढे आपल्या धाडसाचा नवा आदर्श ठेवला आहे. एवढेच नाही तर येत्या दिवसांत अशा धाडसी कारवायात सातत्य ठेवण्याचा त्याचा विचार आहे. भविष्यात संरक्षण खात्यात काम करण्याची आवड असलेल्या आदर्शला सदैव कुटुंबीयांकडून प्रेरणेचे धडे दिले जात आहेत.
हेही वाचा - ‘समृद्धी’च्या टिप्परने बकरीला उडविले, सांगा वाहनांच्या वेगावर नियंत्रण कुणाचे?
आदर्श तोहोगाव येथील भारतीय माध्यमिक तथा स्व.बाजीरावजी मून उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेच्या बारावीचा विद्यार्थी आहे. धाडसी कवायतीची आवड असलेल्या आदर्शला खरी प्रेरणा पुलगावच्या इंडियन मिलीटरी स्कूलमधून मिळाली. तेथील प्रा. प्रवीण शेळके इंडियन माउंटेरिंग फाउंडेशन, दिल्लीचे सदस्य आहेत. ते स्वतः सह धाडसी कवायतीसाठी इच्छूक विद्यार्थ्यांना पर्वतरांगावरील कवायतीसाठी नेत असतात. यातच आदर्शला धाडसी कवायतीत आवड असल्याने त्याची यासाठी निवड करण्यात आली. यावेळी राज्यातून यासाठी 2 मुले, 2 मुली आणि स्वतः प्रा. शेळके सरांनी या धाडसी मोहिमेत सहभाग घेतला. देशभरातून यात 22 व्यक्तींनी सहभाग नोंदवला. यातील 18 व्यक्ती हिमालय पर्वतातील धौलाधार पर्वत रांगामधील माऊंट पतालसू नावाचे 4220 मीटर ऊंचीचे पर्वत सर करण्यापूर्वी काढता पाय घेतला आणि माघारी परतले. मात्र, आदर्श आणि त्याच्या महाराष्ट्रातील इतर सहकाऱ्याने हार न मानता 4220 मीटरची पर्वतरांग सर