satish kayande, sanjay khadase, dr ashish bobade and abhang jadhav
sakal
सिंदखेड राजा - मातृतीर्थ सिंदखेड राजाला राज्याच्या पर्यटन नकाशावर विशेष स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिंदखेड राजा येथे भेट देऊन प्रस्तावित पर्यटन विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपलब्ध जागा,पायाभूत सुविधा आणि प्राधान्याने राबविण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला.