सहा वर्षीय चिमुकलीचे तोंड दाबले, तिला गल्लीत नेले आणि...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

 छोटी सायकल गल्लीत फिरवीत असलेल्या चिमुकलीचे (वय सहा), रेहान उर्फ इमरान बेग युनूस बेग (वय 21, रा. इतवाराबाजार) याने तोंड दाबून अपहरण केले.

अमरावती : घरासमोरील गल्लीत सायकल चालवीत असलेल्या चिमुकलीचे एका युवकाने अपहरण करून निर्जनस्थळी नेऊन तिचा लैंगिक छळ केला. हा प्रकार काहींच्या लक्षात येताच संतप्त जमावाने त्या युवकाला पकडून चोपले.

शहरातील जवाहरगेट मार्गावर बुधवारी (ता. 27) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. तापमान कमी झाल्यानंतर आपली छोटी सायकल गल्लीत फिरवीत असलेल्या चिमुकलीचे (वय सहा), रेहान उर्फ इमरान बेग युनूस बेग (वय 21, रा. इतवाराबाजार) याने तोंड दाबून अपहरण केले. परिसरात महापालिकेच्या स्वच्छतागृहात नेऊन तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला.

अत्याचार सहन करू न शकल्याने ती रडायला लागली. तिचा आवाज ऐकून परिसरातील चिमुकलीच्या काही नातेवाइकांनी रेहान उर्फ इमरान याला पकडून चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती शहर कोतवाली पोलिसांना दिली. घटनास्थळाहून पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले. भरदिवसा रहदारी सुरू असताना ही घटना घडली.

मधू' इथे अन्‌ "चंद्र' तिथे! कोरोनाच्या अमावस्येने केलीय प्रेमी युगुलांची ताटातुट

 

पीडित चिमुकलीच्या नातेवाइकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून रेहान विरुद्धविनयभंग, अपहरणासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. गुरुवारी (ता. 28) त्याला तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर हजर केले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, सदर युवकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After little girl abduction Beaten to sexual harassment