esakal | श्रद्धापूर्ण भीती! चोरीनंतर चोरट्याने देवीला हात जोडून मागितली क्षमा
sakal

बोलून बातमी शोधा

श्रद्धापूर्ण भीती! चोरीनंतर चोरट्याने देवीला हात जोडून मागितली क्षमा

श्रद्धापूर्ण भीती! चोरीनंतर चोरट्याने देवीला हात जोडून मागितली क्षमा

sakal_logo
By
अभिजित घोरमारे

भंडारा : चोर चोरी केल्यानंतर निघून जातो. जाता जाता घराचे नुकसानही करतो. सगळे सामान्य फेकफाक करतो. मात्र, चोरी केल्याचा त्याला कोणताही पश्चात्ताप होत नाही. कारण, हा त्याचा धंदा असतो. चोरी केल्याशिवाय त्याचे घर चालत नाही. एक प्रकारे हाच त्याचा व्यवसाय असतो. मात्र, चोरी केल्यानंतर चोराने क्षमा मागितल्याचा प्रकार भंडाऱ्यात घडला. तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र, ही घटना खरी आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली नसती तर कोणाचाही विश्वास बसला नसता. (After-the-theft-the-thieves-joined-hands-and-asked-for-forgiveness)

भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात सुप्रसिद्ध चंडिका माता मंदिर आहे. या मंदिरात रात्री दोन वाजता दोन चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी दानपेटीला लक्ष करीत फोडली. फोडल्यानंतर पेटीतील पैसे काढून घेतले. लॉकडाउन असल्याने मंदिर आजही बंदच आहेत. त्यामुळे पेटीत फारसे पैसे नव्हते. मिळेल तितके पैसे घेऊन एक चोर निघून गेला.

मात्र, दुसरा चोर तिथेच थांबला. तो देवीकडे एकसारखा पाहत होता. काही वेळांनी त्याने देवीला आपल्या कृत्याची हात जोडून क्षमा मागितली. देवीला हात जोडून नमस्कार केल्यानंतर तोही मंदिरातून बाहेर पडला. विशेष म्हणजे चोरांनी मंदिरात प्रवेश करताना चप्पल घातली नव्हती. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पवनी पोलिसांची अज्ञात आरोपीविरोधात तक्रार नोंद केली असून, पोलिस आरोपींच्या शोधात आहे.

हेही वाचा: किती ही हिंमत! वनविभागाच्या जमिनीवरच पाडले प्लॉट

घटना सीसीटीव्हीत कैद

असे म्हणतात देवावरील आस्था आणि विश्वास नेहमी श्रद्धापूर्ण भीतीकडे घेऊन जातो. मग ती भीती सामान्य माणसाला असो की चोराला सर्वांना सारखीच असते. पवनीच्या चंडिका माता मंदिरात झालेली चोरी आणि चोरट्याने देवीला हात जोडून मागितलेली क्षमेवरून हे सिद्ध होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली नसती तर कोणाचाही यावर विश्वास बसला नसता, हेही तितकेच खरं.

(After-the-theft-the-thieves-joined-hands-and-asked-for-forgiveness)