

Yavatmal
esakal
यवतमाळ: मॉन्सून तोंडावर आला आहे. शेतकर्यांनी शेतीच्या मशागती आटोपून घेतल्या आहेत. आता बी-बियाणे, खते, कीटकनाशक खरेदीसाठी शेतकर्यांची लगबग पहावयास मिळणार आहे. मात्र, पीककर्ज वाटपाची गती अतिशय मंदावलेली आहे. आतापर्यंत जवळपास 475 कोटी 80 लाख म्हणजे 21 टक्के पीककर्ज वाटप केले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेने 194 कोटीचे कर्ज वाटप केले आहे.