

Gadchiroli Accident
sakal
अहेरी (जि.. गडचिरोली) : अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या अंत्यविधीनंतर परतत असताना त्यांच्या नातेवाईकांच्या चारचाकी वाहन नदीच्या पुलावरून कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवार (ता. २०) दुपारी खमनचेरू आणि बोरी दरम्यान असलेल्या दिना नदीच्या पुलावर घडली.